What is affiliate marketing in marathi? Affiliates marketing मधून पैसे कसे कमवायचे?

What is Affiliate Marketing in Marathi?

 

affiliate marketing in marathi:- जेव्हा आपण how to earn money online in Marathi’ हा प्रश्न गूगल वर सर्च करतो. त्यावेळी freelancing, blogging, youtube, surveys, अशा काही मार्ग आपल्याला सुचवले जातात. त्यासोबत आपल्याला affiliate marketing ह्याविषयी देखील माहिती दिली जाते.

त्यावेळी Affiliate Marketing म्हणजे काय? त्याचा अर्थ काय? तसेच affiliate marketing कसे का करते? आणि Affiliate Marketing मधून पैसे कसे कमवायचे? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात येत असतात. आज आपण या लेखात वरील सर्व प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत. एफिलिएट मार्केटिंगमधून लोक इंटरनेटवर भरपूर पैसे कमवत आहेत. हे मार्केटिंग करणे खूप सोपे आहे आणि कोणीही घरबसल्या सुद्धा affiliate marketing करू शकतो. जर तुम्हाला Affiliate Marketing मधून पैसे कमवायचे असतील तर हा लेख नक्की वाचा.

 

affiliate marketing in marathi
affiliate marketing in marathi

 

Affiliate Marketing म्हणजे काय? What is Affiliates marketing meaning in marathi?

एफिलिएट मार्केटिंग ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे तुम्ही एखाद्या कंपनीचे उत्पादन(product) पसंद करता आणि इतरांना उत्पादन खरेदी करण्यास प्रोत्साहित करता आणि जर त्यांनी उत्पादन घेतले तर तुम्हाला काही कमिशन मिळेल म्हणजेच कमिशनच्या रूपात तुम्हाला पैसे मिळतील. या प्रक्रियेला एफिलिएट मार्केटिंग म्हणतात.

affiliate marketing in marathi

 

इंटरनेटचा वापर वाढत असल्याने, अधिकाधिक कंपन्या ऑनलाइन जाहिरातींकडे त्यांचे लक्ष केंद्रीत करता आहेत. ज्यामध्ये ते स्वतःचे Affiliate program सुरू करत आहेत. त्यामुळे त्यांच्या विक्रीत वाढ होत असून त्याचा फायदा अॅफिलिएट मार्केटिंग करणाऱ्या लोकांनाही होत आहे.

 

सध्या लोक एफिलिएट मार्केटिंगला ऑनलाइन पैसे कमवण्याचा एक चांगला मार्ग मानतात. Affiliate Marketing मध्ये, तुम्हाला तुमच्या वेबसाइटवर किंवा सोशल मीडिया account वर Affiliate लिंक शेअर करावी लागेल. जेव्हा कोणीही त्या शेअर केलेल्या लिंकवरून एखादे product किंवा service विकत घेतो तेव्हा तुम्हाला त्या उत्पादनातून काही टक्के कमिशन मिळते. कमिशन हे product category वर अवलंबून असते. फॅशन, लाइफस्टाइल, इलेक्ट्रॉनिक्स, गेम्स, सॉफ्टवेअर इ. कॅटेगरीमध्ये उत्पादनांवर विविध कमिशन उपलब्ध आहेत.

 

इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांवर कमी कमिशन मिळते, तर पुस्तके, फॅशन, लाइफस्टाइल अशा कॅटेगरीतील उत्पादनांवर ५ ते १५% कमिशन मिळते. तुम्ही कोणतेही सॉफ्टवेअर विकण्यात मदत केल्यास तुम्हाला ५० ते ९०% कमिशन मिळू शकते.

Affiliate Marketing कसे काम करता? How Affiliates marketing works in marathi?

जर एखाद्या कंपनीला किंवा किरकोळ विक्रेत्याला आपले उत्पादन विकायचे असेल तर ते जाहिरातींवर जास्त पैसे खर्च करतात. वृत्तपत्रातील जाहिरातींप्रमाणेच टीव्ही किंवा सोशल मीडियावर जाहिराती देणे इत्यादी खूप महाग असतात. आणि माल विकला जाईल याची शाश्वती(guaranty) नसते.

 

अनेक मोठ्या कंपन्या स्वतःचा Affiliate Program चालवतात. जर एखादा YouTuber, ब्लॉगर किंवा सोशल मीडियावर काम करणारी एखादी व्यक्ती ज्याचे फॉलोअर्सची संख्या चांगली आहे, किंवा ज्याला seo आणि digital advertising विषयी माहिती आहे, अशा लोकांना एखाद्या कंपनीच्या Affiliate Program ला जॉइन करायचे असल्यास, त्यांना कंपनीच्या website वर affiliate program जॉइन करावयाची सुविधा दिली जाते.

मग त्यांना ज्या उत्पादनाची विक्री करायची आहे त्याची affiliate लिंक मिळते. ते नंतर ती लिंक त्यांच्या YouTube चॅनेलवर, त्यांच्या वेबसाइटवर किंवा सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करतात.

जेव्हा त्यांचे follower आणि वाचक किंवा इतर लोक त्यांच्याद्वारे शेअर केलेल्या affiliate लिंकवरून काहीही विकत घेतात, तेव्हा अफिलिएट्सला(affiliate marketing करणारे) त्या बदल्यात विशिष्ट कमिशन दिले जाते. एफिलिएट मार्केटिंग करणाऱ्यांना एफिलिएट्स म्हणतात.

समजा तुम्ही Amazon.in वर तुमचे Affiliate Account उघडले आहे. आता तुम्हाला १०० रुपये किमतीची वस्तू विकायची आहे आणि त्या वस्तूवर affiliate कमिशन १०% आहे. त्यानंतर तुम्ही त्या वस्तूची लिंक तुमच्या यूट्यूब चॅनलवर किंवा तुमच्या ब्लॉगवर किंवा सोशल मीडियावर शेअर करतात आणि त्यातून तुम्ही उत्पादन विकले असल्यास. त्या 100 रुपयांच्या वस्तूवर तुम्हाला 10% किंवा 10 रुपये कमिशन मिळेल. ते तुम्ही बँक खात्यावर withdraw करू शकता.

Affiliates marketing कशाप्रकारे करावी? How to do Affiliates marketing in marathi?

एफिलिएट मार्केटिंग करण्यासाठी सुरुवातीला, तुम्हाला कोणत्याही ई-कॉमर्स वेबसाइटवर जावे लागेल आणि सर्वात स्वस्त आणि सर्वोत्तम क्वालिटीचे उत्पादन शोधावे लागेल, ज्यास लोकांनी पाहिल्यावर लगेच ते खरेदी करण्यास तयार होतील. त्यानंतर त्या उत्पादनाची affiliate लिंक तुमच्या सोशल मीडियावर किंवा तुमच्या वेबसाइटवर शेअर करावी लागेल. जितक्या वेळा लोक या लिंकवर क्लिक करून उत्पादन खरेदी करतील तितक्या वेळा तुम्हाला कमिशन मिळेल.

ई-कॉमर्स व्यतिरिक्त, जर तुम्हाला इतर कोणत्याही कंपनीच्या affiliate प्रोग्रामबद्दल माहिती हवी असेल, तर तुम्ही त्या कंपनीचे नाव आणि त्यापुढे affiliate program लिहून Google वर शोधू शकता. (उदा. godaddy affiliate program, hostinger affiliate program etc.) त्यांच्याकडे affiliate program असल्यास, तुम्हाला माहिती मिळेल आणि, तुम्ही affiliate program join करू शकाल.

एफिलिएट मार्केटिंग हा भरपूर प्रमाणातपैसे कमवण्याचा एक ऑनलाइन मार्ग आहे.  जे ऑनलाइन क्षेत्रात काम करू इच्छित आहेत, त्यांच्यासाठी एफिलिएट मार्केटिंग कसे करावे? हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण ह्यामध्ये वेळ लागू शकतो. ह्यात, कालांतराने तुम्हाला अनेक गोष्टी शिकायच्या असतात. जर तुम्ही कामचांगल्या प्रकारे केल्या नाहीत तर तुमचा मौल्यवान वेळ वाया जाऊ शकतो, जो तुम्ही इतरत्र गुंतवू शकला असता. त्यासाठी संपूर्ण तयारी करूनच तुम्ही ज्याची सुरुवात केली पाहिजे.

एफिलिएट मार्केटिंग करण्यासाठी तुम्हाला इंटरनेटची माहिती असायला हवी, लिंक कशी बनवायची? शी आणि कुठे शेअर करायची? सोशल मीडिया अकाउंटवर लिंक कशी शेअर करावी? तसेच पेड मार्केटिंग कशाप्रकारे करावी? Affiliate marketing करतांना वरील गोष्टी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जेणेकरुन आपण कमी खर्चात ग्राहक शोधुन चांगले कमिशन मिळवू.

YouTube वर विविध चॅनेल उपलब्ध आहेत जे एफिलिएट मार्केटिंगबद्द विनामूल्य माहिती आणि शिक्षण देतात. तुम्ही सर्वोत्तम चॅनेलपैकी एक निवडून एफिलिएट मार्केटिंगबद्दल मूलभूत ज्ञान मिळवू शकता.

 

तुम्‍ही एफिलिएट मार्केटिंगबद्दल करण्याबद्दल विचार करत असल्‍यास किंवा त्यात करिअर करू शकता असे तुम्हाला वाटत असल्‍यास, तुम्‍ही एखादे मोफत किंवा थोडे पेड कोर्स खरेदी करून अॅफिलिएट मार्केटिंग शिकू शकता.

Some Best affiliate program in marathi- काही affiliate program 

affiliate marketing in marathi

 

ऍमेझॉन असोसिएट्स

नवीन AFFILIATE MARKETERS साठी हे सर्वोत्कृष्ट प्लॅटफॉर्म आहे. Amazon affiliate program मध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी कोणतेही fees(शुल्क) लागत नाही. Amazon वर कित्येक प्रकाराचे प्रॉडक्ट आहे,त्यांची विक्री करून आपण चांगले कमिशन मिळवू शकतो. ह्यात कमीतकमी 2500रु. कमिशन मिळवल्यावर आपण बँकेत ट्रान्सफर करू शकतो.

BigRock Affiliate 

Bigrock ही एक web-hosting आणि सर्वर पुरवणारी कंपनी आहे. Bigrock चे कमिशन 30% पर्यंत असते. आणि प्रत्येक विक्रीवर 10,000 रु. पर्यंत कमिशन bigrock मार्फत मिळवले जाते.

Clickbank

हे affiliate स्टोर जगातील सर्वात प्रसिद्ध affiliate program पैकी एक आहे. हे डिजिटल प्रोडक्टसच्या affiliate साठी बनलेले आहे. ह्यात देखील चांगल्याप्रकारे कमिशन मिळून जाते. Us आणि uk ह्या देशांत affiliate marketing करण्यासाठी तुम्ही Clickbank चा वापर करू शकतो.

हे काही affiliate नेटवर्क आम्ही सुचविले आहेत. ह्याव्यतिरिक्त देखील खुप affiliate प्रोग्राम आहे. त्यांना जॉइन करून तुम्ही पैसे कमवू शकता.

Affiliate Marketer मध्ये यश कसे प्राप्त कराल?

एक यशस्वी एफिलिएट मार्केटर बनण्यासाठी, तुम्हाला अशा अनेक गोष्टी जाणून घ्याव्या लागतील, ज्यामुळे तुमची कमाई तर वाढेलच पण तुमच्या फॉलोअर्सचा आणि वाचकांचा तुमच्यावर विश्वासही टिकून राहील.

सर्वप्रथम, तुम्हाला योग्य उत्पादने किंवा सेवांची affiliate marketing करतांना निवड करावी लागेल जी तुमच्या प्रेक्षकांसाठी कामात येतील आणि त्यासाठी वस्तु किंवा सेवेच्या बदल्यात पैसे दिल्यानंतर ते निराश होऊ नये. तुमच्या प्रेक्षकांना तुम्ही वापरलेले उत्पादन विकत घेण्यास सांगा. असे उत्पादन ज्याचा वापर केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारची तक्रार नाही. 

जर तुम्ही ब्लॉग किंवा YouTube चॅनेलद्वारे affiliate marketing करत असाल, तर तुमच्या फॉलोअरला उत्पादनाबद्दलच्या प्रत्येक महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर द्या जेणेकरून ते तुमच्यावर विश्वास ठेवू शकतील आणि तुम्ही सांगितलेल्या उत्पादनास खरेदी करू शकतील. उत्पादन विकण्यासाठी तुमचा ब्लॉग लेख किंवा YouTube व्हिडिओ आकर्षक बनवा.

 

तुम्ही एक चांगला कमिशन देणारा आणि विश्वासार्ह असा affiliate प्रोग्राम निवडा. आणि affiliate marketing ची journey सुरू करा.

Best of Luck!!!!!!

तर मित्रांनो, What is affiliate marketing in marathi? Affiliates marketing मधून पैसे कसे कमवायचे? ह्या लेखात आपण affiliate marketing विषयी संपूर्ण माहिती घेतली आहे. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर ह्यास नक्की शेअर करा. तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की विचारा. धन्यवाद!

 

Leave a Comment