Upstox Information in Marathi- Upstox काय आहे? how to earn money from upstox in marathi?

Rate this post

Upstox information in Marathi- earn money Upstox in Marathi

upstox information in marathi:- सध्या अनेक लोक पैसे कमावण्यासाठी विविध प्रकारचे मार्ग शोधत आहेत. जर तुम्हीपण, पैसे कमावण्याचे मार्ग शोधत असाल तर ह्या लेखास नक्की वाचा. ह्यात Upsotck ह्या trading app पासून पैसे कसे कमावता येईल ह्याविषयी आम्ही माहिती देणार आहोत. चला तर पाहुयात.

upstox information in marathi
upstox information in marathi

What is upstox in marathi? Upstox काय आहे?

Upstox हे एक मोबाइल trading application आहे. Upstox ची स्थापना 2009 मध्ये केली गेली होती. ही एक private कंपनी असून RKSV Securities Pvt Ltd. ह्यांच्या मालकीची आहे. तुम्हाला जर शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्याची आवड असेल, तर Upstox हे trading application तुमच्यासाठी खूप चांगले आहे. हे भारतातील सर्वात उत्कृष्ट trading app आहे. ह्या application द्वारे तुम्ही कंपनीचे stocks, IPO आणि mutual funds मध्ये अवघ्या काही वेळातच पैशांची गुंतवणूक करू शकता. Upstox भारतातील Leading Brokerage Company म्हणून देखील ओळखले जाते.

Upstox app किंवा वेबसाइट वर अकाऊंट तयार करून, Upstox हे सार्वजनिक बाजारपेठांमध्ये आत्मविश्वासाने सहभागी होण्यास आणि Compound Interest च्या मदतीने  संपत्ती निर्माण करण्यास मदत करते.

Upstox मध्ये तुम्हाला चार्टिंग(Charting), विश्लेषण(Analytics), तसेच ट्रेडिंग यासह विविध व्यापार वैशिष्ट्ये दिसते. Upstox ने टायगर ग्लोबल, कलारी कॅपिटल आणि रतन टाटा यांसारख्या इतर गुंतवणूकदारांसोबत भागीदारी (partnership)मिळवली आहे. कंपनी NSE सारख्या स्टॉक एक्सचेंजमध्ये रजिस्टर्ड आहे.

सध्या Upstox ने एका दशकाहून अधिक काळ ग्राहकांसाठी संपत्ती निर्माण करण्याचा व्यवसाय केला आहे. Upstox चे तिन्ही founder(संस्थापक) – श्री रवि कुमार, श्री श्रीनि विश्वनाथ आणि कविता सुब्रमनियन, ह्यांनी United State(अमेरिका) मध्ये बहुतेक आयुष्य घालविणे आणि स्वत:च्या अनेक कंपन्या सुरू केल्या. 2009 च्या सुमारास त्यांनी भारतात येऊन दिल्लीतील एका छोट्याश्या अपार्टमेंटमध्ये RKSV नावाची एक छोटीशी कंपनी सुरू केली. ही कंपनी सार्वजनिक बाजारपेठांमध्ये गुतवणूक वाढविण्यास मदत करत होती. RKSV सोबत अनेक लोक जुळत गेले. आणि ही कंपनी देशातील सर्वात जलद गतीने वाढणारी(grow) कंपनी म्हणून ओळखली जाऊ लागली. RKSV लाच Upstox असे नाव आहे.

Benefits of Upstock in marathi- Upstox app वर ट्रेडिंग करण्याचे फायदे

तुम्ही Upstox द्वारे trading करू शकता.  Upstox app च्या सहाय्याने Mutual Funds मध्ये देखील गुंतवणूक करता येते. Upstox App च्या सहाय्याने trading करणे, स्टॉकची खरेदी आणि विक्री करणे हे काम, अवघ्या काही वेळात करता येते.

जर तुम्ही बिजनेस माइंडसेट असलेले व्यक्ती असाल तर तुम्हाला निश्चितपणे याची जाणीव असेल की trading किंवा stock मध्ये पैसे गुंतवून चांगले रिटर्न मिळवता येते. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून लाखो रुपये कमावता येतात आणि म्युच्युअल फंड हा देखील असाच एक मार्ग आहे जो आजच्या काळात दीर्घकालीन पैशांच्या गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम आहे.

खूप कमी ऑनलाइन ट्रेडिंग कंपन्या आहेत ज्या मोफत डीमॅट अकाऊंट सुरू करण्याची संधी देतात आणि अपस्टॉक्स ही त्यापैकी एक आहे. येथे आपल्याला अपस्टॉक्स फ्री डीमॅट खाते कसे उघडायचे याबद्दल देखील माहिती मिळेल. आणि शेअर मार्केटमध्ये एकत्र पैसे गुंतवल्याशिवाय तुम्ही त्यातून कसे कमवू शकता? हे पण सांगितले आहे.

Require Document for Create Demat Account on Upstox – Upstox वर डीमॅट अकाऊंट तयार करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे 

Upstox वर Demat account उघडण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला तुमची ओळख, तुम्हाला पत्ता, तुमचे उत्पन्न आणि बॅंकेसंबंधित काही माहिती . पुरावा सादर करणे आवश्यक असते. तुमचा मोबाइल नंबर हा आधार कार्डशी लिंक असल्यास, तुम्ही कोणत्याही अडचणीशिवाय कागदपत्र अपलोड करून, Upstox मध्ये demat account ओपेन करू शकता.

Upstox वर अकाऊंट उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे-

ओळखीचा पुरावा (Proof of Identity):-

Upstox मध्ये तुम्हाला तुमच्या ओळखीचा पुरावा सादर करावा लागेल. खालीलपैकी कोणतेही कागदपत्र upload करून तुम्ही ओळखीचा पुरावा देऊ शकता.

 • पॅन कार्ड
 • आधार कार्ड
 • पासपोर्ट
 • मतदान कार्ड
 • ड्रायविंग लायसेंस
 • केंद्र किंवा राज्य सरकारने जारी केलेले इतर कोणतेही ओळखपत्र.

कायमस्वरूपी किंवा तात्पुरतापत्रव्यवहाराचापत्त्याचा पुरावा (Proof of Permanent and Correspondence Address):- 

तुमचे कायमस्वरूपी आणि पत्रव्यवहाराचे पत्ते हे समान असल्यास, तुम्हाला खालीलपैकी कोणतेही एक कागदपत्रे सादर करावी लागतील:

 • आधार कार्ड
 • पासपोर्ट
 • मतदान कार्ड
 • रेशनकार्ड
 • ड्रायविंग लायसेंस
 • बँक खाते स्टेटमेंट किंवा बँक पासबुक
 • वीज बिल,
 • गॅस बिल,
 • इतर अत्यावश्यक सेवांची बिले.

चालू बँक खात्याचा पुरावा:- 

तुमचे बँक खाते कार्यरत स्थितीत आहे की नाही हे तपासण्यासाठी ते सबमिट करणे आवश्यक आहे. पडताळणीसाठी तुम्ही खालील दोन कागदपत्रांपैकी एक सबमिट करू शकता.

 • पासबूक
 • बँक स्टेटमेंट
 • चेकबूक

उत्पन्नाचा पुरावा(Proof of Income):-

F&O मध्ये ट्रेडिंग करण्यासाठी तुम्हाला तुमच्या उत्पन्नाची पडताळणी करण्यासाठी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. त्यासाठी खालीलपैकी कोणतेही कागदपत्र सादर करता येईल.

 • इन्कम टॅक्स रिटर्नची (ITR) प्रत.
 • वार्षिक उत्पन्नाची प्रत
 • मागील 6 महिन्यांचे बँकखात्याचे स्टेटमेंट
 • डिमॅट अकाऊंट स्टेटमेंट.
 • पगारी उत्पन्न असल्यास- पगार स्लिप आणि फॉर्म 16 ची प्रत.
 • नेट वर्थ सर्टिफिकेट.

How to earn money from upstox in marathi?  upstox मधून पैसे कसे कमवायचे?

आपण Upstock विषयी संपूर्ण माहिती घेतली आहे. आता आपण अपस्टॉक्समधून पैसे कसे कमवू शकतो ते जाणून घेऊया.

1. अपस्टॉक्स प्लॅटफॉर्मवर ट्रेडिंगद्वारे पैसे कसे कमवाल?

तुम्ही Upstox पासून पैसे कमवू इच्छित असाल तर, तुम्ही सोप्या पद्धतीत ट्रेडिंग करून Upstox द्वारे पैसे कमवू शकता. तुम्हाला माहिती आहे की, अपस्टॉक्स हे एक स्टॉक ब्रोकर अॅप्लिकेशन आहे. Upstock वर तुम्हीशेअर्स खरेदी आणि विक्री करू शकतात

जर तुम्हाला शेअर मार्केटचे चांगले ज्ञान असेल, तर तुम्ही कमी किमतीत शेअर्स खरेदी करून, किमती वाढल्यावर शेअर्स विकून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. पण यासाठी तुम्हाला शेअर मार्केटविषयी काही प्राथमिक माहिती असणे आवश्यक आहे. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही YouTube वरून किंवा काही पुस्तक वाचून स्टॉक ट्रेडिंगबद्दल जाणून घेऊ शकता.

Upstox वर Refer and Earn द्वारे पैसे कसे कमवाल

 • जर तुम्हाला शेअर मार्केटचे काहीच ज्ञान नसेल. आणि, तुम्ही Upstox पासून पैसे कमवू इच्छित असाल. तर, तुम्ही refer and earn प्रक्रियेचा वापर करा.
 • तुम्ही यशस्वीरित्या Upstox अकाऊंट तयार केल्यानंतर तुम्हाला Refer & Earn प्रोग्राममध्ये प्रवेश मिळेल आणि तुम्ही तुमच्या मित्रांना रेफर करू शकता आणि कमिशन मिळवू शकता. मिळालेल्या कमिशनला तुम्ही बँकेत ट्रान्सफर करू शकता किंवा तुम्ही ट्रेड तसेच म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता.
 • तुम्ही तुमच्या ओळखीमध्ये, ग्रुपमध्ये किंवा इतर कोणत्याही सोशल मीडिया माध्यमातून Upstox अॅप मोठ्या प्रमाणावर शेअर करून लोकांना या प्लॅटफॉर्मवर आणल्यास, तुम्ही Upstox अॅपवर Refer & Earn द्वारे सहज पैसे कमवू शकता.

How to Create Demat Account in Upstox?

Upstox मध्ये डीमॅट आणि ट्रेडिंग अकाऊंट दोन प्रकारे तयार केले जातात. तुम्ही ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही प्रक्रियेद्वारे Upstock वर Demat account उघडवू शकता,

जर तुमचा मोबाइल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक असेल, तर तुम्हाला ऑनलाइन खाते उघडण्यासाठी फक्त १५ मिनिटे लागतील आणि जर तुमचा मोबाइल नंबर आधार कार्डशी लिंक नसेल. मग तुम्हाला फॉर्म भरावा लागेल. आणि Upstox ला कुरियर करावे लागेल.

Upstox मध्ये Demat अकाऊंट उघडण्यासाठी खालील क्रिया करा.

 1. अपस्टॉक्स खाते उघडण्यासाठी ह्या लिंकवर क्लिक करा.
 2.  ईमेल आणि मोबाइल नंबर प्रविष्ट करा. आणि आपल्या मोबाइलवर OTP मिळवा.
 3. पुढील स्क्रीनमध्ये, तुमचा पॅन कार्ड क्रमांक आणि जन्मतारीख आणि पत्ता प्रविष्ट करा.
 4. आता तुम्हाला तुमचे Gender, Martial Status, Annual income, Trading Experience, तुमचा व्यवसाय निवडावे लागेल.
 5.   तुमचे प्राथमिक बँक तपशील जसे की खाते क्रमांक आणि IFSC कोड इ. प्रदान करा.
 6. उत्पन्नाच्या पुराव्याची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा.

अशा प्रकारे तुमचे Demat account यशस्वीरित्या तयार होईल.

तर मित्रांनो, आपणUpstox Information in Marathi- Upstox काय आहे? Earn money from Upstox in Marathi”  ह्या लेखात Upstox विषयी संपूर्ण माहिती घेतली आहे. तुम्हाला हे लेख आवडल्यास ह्यास नक्की शेअर करा. धन्यवाद!

Leave a Comment