Programming म्हणजे काय? Programming in Marathi

Programming in Marathi : गेल्या काही दशकापासून computer आणि इतर क्षेत्रातील तंत्रज्ञान विकासाने संपूर्ण जग बदलून टाकले आहे. ऑटोमेशनमुळे प्रत्येक काम जलदगतीने, अचूकतेने आणि निरंतर होत राहते. आजकाल बरेच विद्यार्थी त्यांच्या स्वप्नातील तंत्रज्ञान कंपनी (tech-company) मध्ये नोकरी मिळविण्यासाठी computer science ह्या शाखेची ची निवड करतात. त्यात त्यांना programming हा विषय देखील असतो. आपण ह्याच विषयाची माहिती आजच्या लेखात घेणार आहोत. ह्यात आपण programming म्हणजे काय? आणि programming language यांविषयी सखोल माहिती पाहुयात.

What is programming in marathi? Programming म्हणजे काय?

Programming म्हणजे एखादे काम निरंतरपणे आणि पायरीनुसार(step-by-step) करण्यासाठी संगणक किंवा इतर उपकरणांना सूचना देणे. Programming हा सूचनांचा एक संच (set of instructions’) असतो. ज्यामुळे संगणक एखादे विशिष्ट कार्य करू शकतो. Computer मधील कोणतेही काम हे एका सॉफ्टवेअर मार्फतच होते. कोणतेही सॉफ्टवेअर एखाद्या विशिष्ट कामासाठी तयार केले जाते. म्हणजे त्याकामासोबत इतर कोणतेही काम सॉफ्टवेअर करत नाही. जसे, की calculator, हे देखील एक सॉफ्टवेअर आहे. ज्यास बेरीज करण्याचे काम दिल्यास ते फक्त बेरीजच करणार, इतर क्रिया नाही. ही सॉफ्टवेअर प्रोग्राममिंग मार्फतच तयार केली जातात. Programming मुळेच सॉफ्टवेअर म्हणजेच प्रोग्राम डिजाइन केले जातात. Programming ही एक अशी प्रक्रिया आहे, ज्यामुळे लॉजिकल गोष्टी आपण संगणकात अस्तित्वात आणू शकतो.

What is programming languages in marathi? Programming language म्हणजे काय?

Programming language म्हणजेच computer language म्हणजेच संगणकाची भाषा! Programming language ही एक प्रकारची वाक्य रचना असते. ह्यास कोडिंग द्वारे लिहिले जाते. खरं तर प्रोग्रामिंग भाषा ही आपल्या आणि संगणकामध्ये संभाषण करण्याचे काम करते. संगणक, मोबाइल आणि इतर उपकरणांत programming language चा वापर केला जातो.
संगणकाला programming language मधूनच सूचना दिल्या जातात. खर तर संगणक आणि इतर डिजिटल उपकरणांना programming language समजत नाही. त्यांना फक्त binary language समजते. Binary language ही 0 आणि 1 ह्या दोन अंकांच्या स्वरुपात असते. ज्यास bits देखील म्हटले जाते. Binary language लाच आपण machine language देखील म्हणतो.

जेव्हा लोक कॉम्प्युटरशी संवाद साधतात किंवा कोणतेही विशिष्ट काम करण्यास सांगतात तेव्हा ते कॉम्प्युटरला काय करण्यास सांगत आहेत, याविषयी अतिशय ठाऊक असणे आणि त्या कामाच्या क्रियेविषयी हेतु स्पष्ट असणे, महत्त्वाचे आहे. programming language हे एक चांगले स्त्रोत आहे जे त्यांना हे काम करून देते. ज्याप्रकारे आपण संभाषण करतो त्याचप्रकारे आपण संगणकाची संभाषण केल्यास आपल्या कामाचा अर्थ वेगळा निघू शकतो. एकाचे शब्दाचे दोन अर्थ असतात. आणि त्यामुळे गैरसमज देखील होऊ शकतो. त्याचमुळे programming language चा वापर संगणकात होतो.

Programming language ला machine language मध्ये स्थलांतर करून विविध प्रोग्राम संगणकात चालवले जातात. Programming language ला machine language मध्ये स्थलांतर करण्याचे काम एक प्रकारचे सॉफ्टवेअर करते. त्यास compiler असे म्हटले जाते. संभाषण करण्यासाठी ज्याप्रकारे अनेक भाषा आपण वापरतो, त्याचप्रकारे संगणकसोबत संभाषणासाठी देखील अनेक programming language द्वारे संभाषण करता येते.
जसे- java, javascript, HTML, C, C++, C#, SQL, PHYTHON, CSS, इत्यादी.
तुम्ही वरीलपैकी कोणत्याही programming language वापरुन programming करू शकता.

 परंतु, यांपैकी काही language विशिष्ट कामासाठी वापरल्या जातात. जसे- html language चा वापर वेबसाइट तयार करण्यासाठी होतो. तर c language चा वापर ऑपरेटिंग सिस्टम आणि विविध प्रकारचे अॅप्लिकेशन त्यायर करण्यासाठी होतो. आणखी काही programming language विषयी माहिती तुम्हाला खालील परिच्छेदात देण्यात येईल.

Types of programming language- programming language चे प्रकार


Low leval programming language

ह्या प्रकारच्या progrmming language ला विशिष्ट प्रोग्राम तयार करण्यासाठी होतो. ह्या binary language असतात. 0 आणि 1 या दोन अंकांच्या रूपात असल्याने ह्यांना शिकणे आणि समजणे खूप कठीण असते. Machine आणि assembly language हे ह्याचे प्रमुख प्रकार आहे. ह्या प्रकारच्या programming language ने तयार केले गेलेले अॅप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर CPU द्वारे लवकर अॅक्सेस होतात. ज्यामुळे तयार झालेले प्रोग्राम किंवा अॅप्लिकेशन जलदगतीने काम करतात. यातून कोणतेही अॅप्लिकेशन आणि सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी जास्त कालावधी लागून जातो. आणि समजण्यासाठी हे कोड कठीण देखील असतात.

High Level programming language

ह्या प्रकारच्या language समजण्यास सोपे असतात. अशा प्रकारच्या लॅंगवेज चा वापर करून खूप कमी कलावधीत अॅप्लिकेशन किंवा प्रोग्राम तयार केला जाऊ शकता. यांना समजण्यासाठी जास्त प्रशिक्षित होणे देखील गरजेचे नसते. ह्या languages समजण्यास सोप्या असल्याने प्रोग्राम तयार करतांना होणार्‍या चुका लवकर समजतात. High Leval programming languages ह्या 0 आणि 1 ह्या binary कोड मध्ये नसतात. परंतु, तयार केलेला प्रोग्राम Compiler द्वारे binary कोडमध्ये म्हणजेच machine language मध्ये स्थलांतर केला जातो.

काही लोकप्रिय programming language- Popular Programming Languages- best programming language to learn

C
ही एक High leval programming language आहे. सर्वात लोकप्रिय लॅंगवेज म्हणून C लॅंगवेज ओळखली जाते. Unix operating system तयार करण्यासाठी ह्या लॅंगवेज ला तयार करण्यात आले होते. सी प्रोग्रामरला वाचणे, समजणे, कोड करणे खूप सोपे जाते. १९६६ मध्ये मार्टिन रिचर्ड नावाच्या व्यक्तीने बीसीपीएल नावाची प्रोग्रॅमिंग भाषा तयार केली होती. त्यात काही त्रुटि असल्याने Dannius Ritchie यांनी 1972 मध्ये C language तयार केली होती. C ला General purpose language देखील म्हटले जाते. सी ही एक सोपी लॅंगवेज आहे.

C++
ही लॅंगवेज Bjarne Stroustrup ने 1985 मध्ये तयार केली होती. C लॅंगवेज प्रमाणे C++ देखील काम करते. परंतु, ह्यातील काही कन्सेप्ट उच्च स्तरीय(advance) आहेत. C ++ च्या मदतीने समान प्रोग्राम कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टमवर चालवू शकतो. ही एक ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग भाषा आहे, हे त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये आपल्याला क्लासेस, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम सारखी वैशिष्ट्ये मिळतात. जर तुम्ही c किंवा c++ यांपैकी कोणत्याही एका लॅंगवेजपासून programming शिकण्याची सुरुवात केल्यास विविध कन्सेप्ट तुमचे लक्षात राहतात. 
 
Java
एका आकडेवारीनुसार तीस लाखांपेक्षा अधिक डिवाइसमध्ये java प्रोग्रामिंग लॅंगवेजमध्ये कोडिंग केली गेली आहे. यावरुन java देखील खूप लोकप्रिय आहेच. James Gosling ह्यांनी Java programming लॅंगवेज ला तयार केले. सी++ मधील वापरण्यात येणारे काही नियम Java मध्ये वापरले जातात. Java चा वापर करून विविध वेबअॅप्लिकेशन, electronic अप्प्स, मोबाइल अॅप्लिकेशन ह्यांना तयार केले जाते. विशेष मध्ये Java चा वापर करून तयार केले गेले प्रोग्राम कोणत्याही प्लॅटफॉर्म वर काम करू शकता.

PHP
PHP ही अनेक वेब डेव्हलपर्सना आवश्यक वाटणारी programming language आहे. सर्व वेबसाइट्सपैकी 80% टक्के वेबसाइटमध्ये PHP भाषेचा वापर करण्यात येतो. Wordpress ह्या वेब-डिजाइन प्लॅटफॉर्म PHP चा वापर होतो. हे याचे मुख्य कारण आहे. इतर programming language चा तुलनेत, PHP शिकणे सोपे आहे. कम्प्युटरच्या क्षेत्रात इंटरव्ह्युसाठी जायचे असल्यास तुम्ही PHP भाषेचे ज्ञान मिळवू शकता. सध्या प्रत्येक सॉफ्टवेअर कडे PHP चे ज्ञान असणे देखील आवश्यक आहे.

Phython
phython ही अतिशय सोपी भाषा म्हणून प्रसिद्ध आहे. सोपी असूनसुद्धा सर्वात शक्तीशाली लॅंगवेज म्हणून ही ओळखली जाते. Phython ला 1980 मध्ये तयार करण्यात आले होते. ह्यातील syntax म्हणजेच रचना खूप सोपी असल्याने कमी कलावधीतच ह्यास शिकता येऊ शकते. मोठ-मोठे प्रोजेक्ट, विडियो गेम्स आणि Ai तयार करण्यासाठी या language चा वापर होतो.

How to learn programming in Marathi? Programming कशा प्रकारे शिकावी?

तुम्ही जर programming शिकण्याची सुरुवात करत असाल तर तुम्हाला कम्प्युटर कसे काम करते? ह्याविषयी थोडे ज्ञान असणे महत्वाचे आहे. CPU चे आणि नेटवर्क ची कार्यप्रणाली तुम्ही समजली पाहिजे. विविध प्रकारचे अॅप्लिकेशन आणि त्यामागे होणारी programming तुम्ही पाहिली पाहिजे. त्यासोबतच कम्युनिकेशन म्हणजेच, माहितीची देवाण-घेवाण संगणकात कशा पद्धतीने होते, हे देखील तुम्ही अभ्यासले पाहिजे. प्रत्येक माहितीसाठी तुम्ही इंटरनेटचा वापर करू शकता.
प्रत्येक programming लॅंगवेजचे काहीतरी बेसिक असतेच. त्यांना वारंवार तुम्ही अभ्यासले पाहिजे.

तुम्ही programming शिकण्यासाठी कोणत्याही प्रोग्रामिंग लॅंगवेज द्वारे सुरुवात करू शकता. परंतु माझ्यामते तुम्ही JAVA, python व C++ ह्या programming language सर्वप्रथम शिकल्या पाहिजे. JAVA आणि python ह्या सर्वात सोप्या programming language पैकी एक आहे. त्यांना शिकण्यात तुम्हाला मजा वाटू शकते. आणि C++ तुम्ही programming मध्ये वापरण्यात येणार्‍या प्रत्येक घटकांचा चांगला अभ्यास करू शकता.

Where You can learn programming for free?Programming शिकण्यासाठी काही प्लॅटफॉर्म

खरतर कोडिंग किंवा programming शिकण्यासाठी विविध courses आहेत पण त्यांचा खर्च सर्वांना परवळू शकत नाही. त्यांच्यासाठी इंटरनेटवर असे अनेक प्लॅटफॉर्म आहेत ज्यांचा वापर करून कोणीही programming शिकू शकतो. तसेच, अनेक पुस्तक देखील स्वस्तात उपलब्ध आहेत. त्यांचा वापर तुम्ही करू शकता.

Best platform to learn programming-

  • Udemy
  • Freecodecamp
  • Codeacedamy
  • Skillcrush’s 
  • w3schools
  • Code.org

ह्या काही वेबसाइट आहेत ज्या तुम्हाला programming शिकण्यास मदत करू शकतात.

visit Also : Movieskafanda.xyz

Leave a Comment