Meesho app Information in Marathi- मीशो अँप काय आहे? मीशो अँप बद्दल माहिती?

Rate this post

Meesho app Information in Marathi

आज, कोणीही खूप पैसे गुंतवल्याशिवाय, त्यांच्या घरी आरामात बसून सहजपणे त्यांचा स्वतःचा ऑनलाइन व्यवसाय सुरू करू शकतो. ऑनलाइन खरेदीचा विकास मागील दशकापासून वाढत गेला आहे. आणि जगभरातील ई-कॉमर्स कंपन्या आता अब्जावधी डॉलर्सची कमाई करत आहेत. त्यांचा कमाईमुळे तुमच्या आणि माझ्यासारख्या लोकांना देखील ऑनलाइन पैसे कमवण्याची संधी मिळाली आहे. ती कशी? चला पाहुयात!

मित्रांनो,तुम्ही ऑनलाइन शॉपिंग करत असाल तर, तुम्ही messho अॅप्लिकेशनचे नाव एकलेच असेलच. जर तुम्ही कोणत्याही इनवेस्तमेंटविना ऑनलाइन पैसे बिजनेस करू इच्छित असाल तर तुम्ही हा लेख संपूर्ण वाचा. ह्यात आम्ही तुम्हाला Meesho app विषयी संपूर्ण माहिती दिली आहे. तसेच तुम्हाला messho वरून ऑनलाइन पैसे कसे कमावता येतील?हे देखील सांगितले आहे. चला तर पाहुयात!

Meesho app Information in Marathi
Meesho app Information in Marathi

What Is Messho in marathi? Meesho app काय आहे?

Meesho हे एक रिसेल्लिंग app आहे. तसेच ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी हे एक Allin-One ई-कोमर्स स्टोर आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, हे Amazon आणि Flipkart सारखेच एक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे, ज्यामध्ये तुम्ही ऑनलाइन खरेदी करू शकता. मीशो अॅपमधील सर्व वस्तु हॉलसेल दरात असल्याने, तुम्हाला स्वस्त दरात चांगले प्रोडक्टस मिळतात. meesho कंपनीची स्थापना 2015 मध्ये झाली. ह्याची स्थापना ही विदित आत्रे और संजीव बरनवाल ह्यांनी केली. ह्याचे मुख्यालय हे बंगळूर शहरात आहे.

Meesho  चा वापर दोन प्रकारे वापरू शकता. एक, तुम्ही गुंतवणुकीशिवाय ऑनलाइन व्यवसाय सुरू करू शकता आणि दुसरे म्हणजे तुम्ही स्वतःसाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी फॅशन आणि घरगुती वस्तू खरेदी करू शकता. Meesho अॅपमध्ये, कोणतीही वस्तू इतर ई-कॉमर्स स्टोअरपेक्षा स्वस्तात उपलब्ध आहे.

meesho वर तुम्हाला अनेक प्रकारचे प्रोडक्टस पाहायला मिळतात. Women Ethnic, Women Western, Jewellery & Accessories, Men, Beauty & Health, Bags, Footwear, Home & Kitchen, Kids, Electronics अशा प्रकारचे अनेक प्रोडक्टस Meesho App वर उपलब्ध आहे.

Meesho app द्वारे लहान दुकानदारांना आपले प्रोडक्टस संपूर्ण भारतभर विकण्याची संधी मिळाली आहे. एवढेच नाही तर याशिवाय हे एक डिजिटल मार्केटिंग अॅप देखील आहे ज्यातून तुम्ही ऑनलाइन व्यवसाय देखील करू शकता, तेही कोणत्याही गुंतवणुकीशिवाय. बिझनेस सुरू करण्यासाठी लाखो रुपयांची गरज असते असे तुम्ही लोकांचे म्हणणे ऐकले असेल. परंतु meesho च्या संदर्भात हे खरे नाही. मीशो अॅपमध्ये झिरो इन्व्हेस्टमेंटसह, तुम्ही ऑनलाइन व्यवसाय सुरू करू शकता आणि भरपूर पैसे कमवू शकता.

Meesho चे मुख्य कार्यालय बंगळुरू येथेच आहे. meesho मध्ये एकूण $500M पेक्षा जास्त फंडिंग मिळाली आहे, यावरून सांगू शकतो की meesho हे किती विश्वसनीय app आहे.


History about meesho in Marathi- Meesho चा इतिहास

2015 मध्ये, जेव्हा मीशो सुरू झाले तेव्हा ते FASHNEAR या नावाने ओळखले जात होते. त्याची स्थापना ही संजीव बंसल आणि विदित आत्रे ह्यांनी केली. भारतातील ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेंड पाहून त्यांनी हे अॅप तयार केले. संजीव बंसल हे SonyMobile कंपनी मध्ये देखील कार्यरत होते. त्याचप्रमाणे विदित आत्रे देखील InMobi ह्या मोबाइल मार्केटिंग कंपनीत कार्यरत होते.

FASHNEAR चा व्यवसाय हा Swiggy आणि Zomato सारखाच होता. FASHNEAR ने फॅशनशी संबंधित वस्तूंचा व्यवसाय केला आणि ग्राहकांना त्यांच्या परिसरातील दुकानांमधून कपडे आणि फॅशन अॅक्सेसरीज खरेदी सोय केली. कपडे आणि अॅक्सेसरीज विकणारे दुकानदार FASHNEAR अॅपवर नोंदणी करून स्थानिक ग्राहकांना ऑनलाइन विक्रीची सुविधा देत होते.

काही महिन्यांनंतर FASHNEAR च्या मालकांना ह्यामध्ये त्रुटी जाणवल्या. ग्राहक हे स्थानिक दुकांनदारांकडून ऑनलाइन शॉपिंग करण्यास जास्त उत्सुक नव्हते. आणि दुकानदार देखील आपला business देशवर वाढवण्यास इच्छुक होते. त्यातून FASHNEAR च्या मालकांना एक नवीन बिझनेस प्लान मिळाला. आणि 2015 च्या अखेरीस त्यांनी FASHNEAR चे नाव ‘Meesho’ असे केले.

Meesho च्या मालकांनी हळूहळू अनेक दुकादारांना भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. Meesho ने महिलांद्वारे केले जाणारे व्यवसायावर देखील जास्त भर दिला. घरबसल्या व्यवसाय करणार्‍या महिलांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. आणि त्यातील त्रुटि meesho app द्वारे दूर करून महिलांना comfortably बिझनेस करण्याची सुविधा करून दिली.


How to Download meesho app? Meesho app कसे डाऊनलोड करू शकता.

  • Meesho app डाऊनलोड करण्यासाठी तुम्ही खालील लिंकवर क्लिक करू शकता.
  • वरील लिंक क्लिक केल्यावर playstore वर redirect केले जाईल. तेथून तुम्ही install बटणावर क्लिक करा.
  • त्यानंतर मोबाइल नंबर सबमिट करून तुम्ही OTP मार्फत लॉगिन करू शकता.
  • OTP सबमिट केल्यानंतर यशस्वीरित्या तुम्हाला लॉगिन झालेले दिसेल.

How to Earn money from meesho? Meesho पासून ऑनलाइन पैसे कसे कमावतात?

Meesho app वरुन पैसे कमवण्यासाठी, तुम्हाला Meesho वरील वस्तु वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर करून विकाव्या लागतात. जर तुम्ही ग्राहकांचे चांगले नेटवर्क(follower) तयार केले तर तुम्ही 1 लाख/महिना सहज कमवू शकता.

ऑर्डर बुक केल्यानंतर, मीशो स्वतः डिलिव्हरी आणि रिटर्न करण्याचे काम पाहते. जर तुम्हाला घरी बसून ऑनलाइन पैसे कमवायचे असतील तर मीशो अॅप तुमच्यासाठी खूप फायद्याचे ठरू शकते.

त्यासाठी फक्त meesho वरील products चे लिंक्स आणि फोटो तुमच्या मित्रपरिवाराला किंवा इतरांना व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम इत्यादींवर शेअर करावे लागतील. काळजी करू नका, हजारो लोक ऑनलाइन वस्तू खरेदी करत आहेत, मग तुमच्याकडून का खरेदी करू शकत नाही.

 

Meesho पासून पैसे कमवण्यासाठी खालील प्रक्रिया करा.

Steps 1- प्रॉडक्ट निवडा

Meesho वरुन पैसे कमवण्यासाठी सर्व प्रथम, आपल्याला एक product निवडावे लागेल. असे कोणतेही product जे सध्याच्या काळात उपयुक्त आणि ट्रेंडिंग आहे, जेणेकरून त्याची विक्री करता येईल.

Step 2- शेअर करा.

त्यानंतर ते प्रॉडक्ट शेअर करा. तुम्हाला पाहिजे तिथे तुम्ही शेअर करू शकता. आजकाल लोक सोशल मीडियावर अधिक अॅक्टिव आहेत, म्हणून जर तुम्हाला अधिक विक्री करायची असेल तर Whatsapp, Facebook इ. वर शेअर करा. कोणत्याही प्रॉडक्टसोबत शेअर बटण असते.

Step 3- ऑर्डर सबमिट करा.

जर तुमच्या फॉलोअर्सला,मित्रांना किंवा इतर कोणालाही product आवडले असेल. तर ते तुमच्याकडे प्रॉडक्टची मागणी करतील. त्यावेळी तुम्हाला ते प्रॉडक्ट मीशो अॅपवरून ऑर्डर करावे लागेल. यासाठी तुम्ही पुढील क्रिया करा.

सर्व प्रथम तुम्हाला ज्या प्रॉडक्टची ऑर्डर घ्यायची आहे त्यावर क्लिक करा आणि नंतर Buy Now या पर्यायावर क्लिक करा.

यानंतर, पेमेंट ऑप्शनमध्ये Cash on Delivery आणि UPI यांपैकी कोणताही. पर्याय निवडा. आणि Proceed पर्यायावर क्लिक करा.

आता येथे तुम्हाला तुमचे मार्जिन जोडून प्रॉडक्टचे अंतिम पेमेंट दिसेल. त्यामध्ये तुम्ही तुमचे मार्जिन जोडा आणि नंतर Proceed पर्यायावर क्लिक करा.

यानंतर, ग्राहकाच्या पत्त्याची संपूर्ण माहिती भरा आणि save Address पर्यायावर क्लिक करा आणि पुढे Proceed पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमची ऑर्डर सबमिट केली जाईल. पुढचे काम हे meesho कंपनीचे राहील. ग्राहकाच्या पत्त्यावर यशस्वीरित्या Delivery झाल्यास तुम्हाला तुमचे commission बँक अकाऊंट मध्ये पाठविले जाईल.

तुम्ही वरील क्रिया करून MEESHO द्वारे पैसे कमवू शकता. Messho वर प्रत्येक आठवड्याचे एक टार्गेट दिलेले असते. आपण टार्गेट पूर्ण करून अतिरिक्त पैसे कमवू शकता. तसेच Referal Program ला जॉइन करून तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणखी लोकांना जोडून तुम्ही त्यावर रेफरल कमिशन देखील मिळवू शकता.


तर मित्रांनो आपण Meesho app Information in Marathi- मीशो अँप काय आहे? मीशो अँप बद्दल माहिती? ह्या लेखात, meesho अॅप्लिकेशन विषयी संपूर्ण माहिती पाहिली आहे. निश्चितच तुम्हाला संपूर्ण माहिती मिळाली असेल. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर ह्यास नक्की शेअर करा. आणि तुमचे काही प्रश्न असल्यास कॉमेंट मध्ये नक्की विचारा. धन्यवाद!

Leave a Comment