IAS information in marathi- IAS म्हणजे काय? IAS full form in marathi

ias full form in marathi- प्रत्येक विद्यार्थ्याचा जीवनात शिक्षण घेतल्यानंतर एका मोठ्या पदावर काम करण्याचे स्वप्न असते. काही डॉक्टर तर काही इंजीनियर बनण्याचे स्वप्न पाहतात. जेणेकरून संपूर्ण आयुष्य पैशांच्या कमतरतेशिवाय आनंदाने जगता येईल. परंतु असेही काही विद्यार्थी असतात जे देशाच्या सेवेसाठी काहीही करण्याची जिद्द बाळगतात. त्यांच्यापैकी एक म्हणजे IAS चे स्वप्न पाहणारे विद्यार्थी! देशाच्या सेवेसाठी,देशातील सर्वोच्च पद मिळवण्यासाठी लाखो विद्यार्थी upsc मार्फत होणार्‍या IASपदाच्या परीक्षेसाठी बसतात. आपण आज ह्याच IAS पदाविषयी माहिती घेणार आहोत. ह्यात आपण google वर सर्च केल्या जाणार्‍या ias information in Marathi, ias full form in Marathi, ias eligibility in Marathi, ias in Marathi, ias exam in Marathi, ias exam pattern in Marathi, अशा काही घटकांची माहिती घेतली आहे. चला तर पाहुयात! 

What is IAS in marathi ? आयएएस म्हणजे काय? 

आयएएस ही सर्वात मानाची सेवा म्हणून प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक प्रतिष्ठित,प्रसिद्ध किंवा सर्वात मोठे पद म्हणजेच आयएएस’. भारत सरकारसाठी ही सर्वात प्रतिष्ठित सेवा आहे. आयएएस ची सेवा भारताची प्रमुख केंद्रीय नागरी सेवा मानली जाते. आयएएस ची भरती ही दरवर्षी भारत सरकारच्या आदेशावरुन UPSC मार्फत घेण्यात येते. UPSCमार्फत घेण्यात येण्यार्‍या सिविल सेवा परीक्षा (civil service examination) द्वारे आयएएसची पदे भरली जातात. IASसोबतच IPS आणि IFS ही पदे देखील ह्याच परीक्षेद्वारे भरली जातात. जुन महिन्यापासून IAS ची भरती प्रक्रिया सुरू होत असून पुढील 8 महिन्यापर्यंत आयएएस भरतीची प्रक्रिया चालू असते. IAS अधिकार्‍यालाच आपण District magistrate म्हणजेच जिल्हा कलेक्टर म्हणून ओळखतो. ज्यास जिल्ह्याचा सर्वात मोठा अधिकारी देखील म्हटले जाते.

IAS Full Form in Marathi- आयएएस चे पूर्ण रूप

इंग्रजीत IAS चे full form म्हणजेच Ias चे पूर्ण रुप indian administrative service असे आहे.

तर मराठीत IAS चे पूर्ण रूप “भारतीय प्रशासकीय सेवा” असे आहे.

Eligibility for IAS in Marathi- आयएएस अधिकारी होण्यासाठी पात्रता

IAS ची परीक्षा देण्यासाठी किंवा IAS अधिकारी होण्यासाठी सरकारद्वारे काही पात्रता निकष ठरावण्यात आले आहेत. ते पुढील प्रमाणे-

1)  नागरिकता-

आयएएस परीक्षेचा अर्ज करण्यासाठी उमेदवार सर्वप्रथम भारताचा नागरिक असणे महत्वाचे आहे.

2)  शिक्षण-

उमेदवारने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेणे आवश्यक आहे. मग ते मान्यताप्राप्त मुक्त विद्यापीठ असो तरी चालते. पदवीच्या अंतिम वर्षात असलेले विद्यार्थी देखील UPSC च्या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. तुम्ही पदवीचे शिक्षण कोणत्याही विषयात करू शकता. उमेदवार पुढील शाखेत पदवीधर असल्यास IASची परीक्षा देऊ शकता. BA, BSC, BSA, B-tech, B.com, B pharmacy, MBBS, BDMS, BHMS, BAMS, BUMS, B-Agri, ह्या शकेतील पदवीधर व्यक्ति IAS परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.

3)  वयोमार्यादा-

ज्या उमेदवारचे वय हे 21 वर्ष पूर्ण असेल ते उमेदवार IAS ची परीक्षा देऊ शकता. उमेदवारचे वय 32 वर्षापेक्षा जास्त नसावे. रिजर्व कॅटेगरीतील उमेदवार 35 वर्षांपर्यंत IAS ची परीक्षा देऊ शकता. Scआणि ST कॅटेगरीतील उमेदवारांचे वय जास्तीत-जास्त 37 वर्ष असावे.

तसेच,जनरल कॅटेगरीतील उमेदवारसाठी 6, ओबीसी category साठी 9 आणि SCST कॅटेगरीतील उमेदवारसाठी अमर्याद अटेम्प्ट असतात.

Exam pattern for Ias exam in Marathi-आयएएस परीक्षेचे स्वरूप

 Ias ची परीक्षा प्रक्रिया तीन टप्प्यात पार पडते. ह्यातपूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत हे तीन टप्पे आहेत.

पूर्व परीक्षा-

पूर्व परीक्षेत प्रत्येकी 200 गुणांचे दोन पेपर घेतले जातात. हे दोन्ही पेपर वस्तुनिष्ठ(objective) स्वरूपाचे असतात.

ह्यातील पेपर 1 मध्ये एकूण 100 प्रश्न असून एका प्रश्नासाठी 2 गुण दिले जातात. ह्यासाठी 2 तासाचा कालावधी असतो. ह्यास जनरल स्टडीज(General Studies 1-GS1) असे म्हटले जाते. GS1मध्ये 1/3 अशा प्रकारे नेगेटिव मार्किंग असते. म्हणजे 1 प्रश्न चुकल्यास 0.66 गुण बरोबर असलेल्या प्रश्नास दिले जातात. GS1 पेपर इंग्लिश आणि हिन्दी या दोन भाषेत घेतला जातो.

 General studies 2(GS2) हा पेपर देखील 2 तासांचा असून ह्यात एकूण 80 प्रश्न असतात. व 2.5 मार्क्स प्रत्येक बरोबर प्रश्नास दिले जातात. ह्यातदेखील नेगेटिव्ह मार्किंग असून, उत्तर चुकल्यास बरोबर असलेल्या एका उत्तरातून 0.17 मार्क्स वजा केले जातात.

मुख्य परीक्षा-

पूर्व परीक्षेतील पेपर 1 मधील मिळालेल्या गुणाच्या आधारावर मेरीट लिस्ट तयार केली जाते. आणि पात्र उमेदवारांना मुख्य मुख्य परीक्षेत बसवले जाते. पूर्व परीक्षेतून,एकूण रिक्त पदांच्या 12 ते 13 पट उमेदवारांची निवड ह्या परीक्षेसाठी होते. 

मुख्य परीक्षेत एकूण 9 पेपर घेतले जातात. यांपैकी 2 भाषेचे पेपर असतात. इंग्रजी आणि एक भारतीय भाषेची निवड आपणास मुख्य परीक्षेसाठी करावी लागते. हे भाषेचे दोन्ही पेपर Qualifying असतात. म्हणजेच ह्या दोन्ही पेपरांत आपणास प्रत्येकी 300 पैकी 74 गुणांची आवश्यकता असते. तरच उरलेले सात पेपरांची तपासणी होते. उरलेले सात पेपर प्रत्येक प्रत्येकी 250 गुणांचे असतात. ह्या सात पेपरांच्या एकूण गुणांच्या आधारावर मुलाखतीसाठी मेरीट लिस्ट तयार केली जाते.

मुलाखत-

 हा परीक्षेचा शेवटच्या टप्पा असतो. मुख्य परीक्षेतून एकूण रिक्त पदांच्या 3 पट उमेदवारांची निवड मुलाखतीसाठी करण्यात येते. मुलाखत 250 गुणांची असून, जवळ-जवळ 20 मिनिटांची असते. ह्यात प्रामुख्याने विचार कौशल्याची तपासणी केली जाते.

मुख्यपरीक्षेतील एकूण गुण आणि मुलाखती मध्ये मिळालेले गुण ह्यांच्या आधारावर रिक्त पदे भरली जातात.

EXAM Syllbus for IAS exam in Marathi- आयएएस परीक्षेसाठी विषय

PRELIMS- पूर्ण परीक्षा

General Studies- सामान्य अध्ययन

ह्या परीक्षेसाठी पूढील विषयांच्या सखोल अभ्यास करणे महत्वाचे असते. भारतीय राजकारण, भूगोल, इतिहास, भारतीय अर्थव्यवस्था, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि पर्यावरणशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध आणि संबंधित चालू घडामोडी.

CSAT

ह्यात ‘तर्क आणि विश्लेषणात्मक’(reasoning and analytical ability) स्वरूपाचे प्रश्न दिलेले असतात.

निर्णय घेण्याची क्षमता ह्या पेपरद्वारे तपासली जाते.

Main- मुख्य परीक्षा

मागील परिच्छेदात सांगितल्याप्रमाणे Upsc mains म्हणजेच मुख्य परीक्षेत 2 भाषेचे पेपर आणि उर्वरित 7 पेपर असतात.

 

  1. त्यातील पेपर 1 हा निबंधाचा असतो.
  2. इतर 6 पेपरविषयी माहिती पुढील प्रमाणे-
  3.  भारतीय साहित्य, संस्कृती,  विश्व आणि समाज ह्यांच्या भूगोल व इतिहास
  4.  सामाजिक न्याय, आंतर्राष्ट्रीय संबंध, शासन, संविधान, समाज कल्याण
  5. तंत्रद्यान, आर्थिक विकास, जैवविविधता, पर्यावरण, सुरक्षा, आपत्ति व्यवस्थापन
  6. नैतिकता, सत्यनित्ता, आणि योग्यता
  7. वैकल्पिक(पर्यायी) विषय 1
  8. वैकल्पिक विषय 2

 

वैकल्पिक(पर्यायी) विषय 1 आणि 2 ह्या विषयांसाठी एकूण 48 विषयांच्या यादीतून उमेदवार विषय निवडू शकतो. ज्या विषयात उमेदवारास जास्त ज्ञान असेल. तोच विषय उमेदवाराने निवडला पाहिजे. जेणेकरून चांगले गुण मिळवता येतील. आणि अंतिम यादीत नाव पक्के होईल.

Work of ias officer in marathi- आयएएस अधिकार्‍याचे काम

आयएएस अधिकार्‍याचे काम सकाळी 9 ते रात्री 9 दरम्यांचे असते. आयएएस अधिकाऱ्याला खूप जबाबदारीची कामे दिली जातात. विविध क्षेत्रातील विकासाची पाहणी करते. त्यांची रीपोर्ट पाहणे,धोरणे तयार करणे, अंमलबजावणी करणे आणि पुनरावलोकन करणे अशा प्रकारची कामे समाविष्ट आहे. विविध विभागांना सल्ला देण्यासाठी आणि  विविध विभागासाठी प्रतिनिधी निवडण्यासाठी आयएएस अधिकाऱ्याची आवश्यकता असते. सरकारी योजना आणि धोरणांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी आयएएस अधिकारी जबाबदार असतो. 

एक IAS अधिकारी त्यांच्या क्षेत्रातील नैसर्गिक आपत्ती, दंगली आणि मोठ्या अपघातांना टाळण्याचे काम करतो.कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आयएएस अधिकारी काम करत असतो. आयएएस अधिकारी त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थापनासाठी जबाबदार असतो. आयएएस अधिकारी अनेकदा विविध अहवालांचे पुनरावलोकन करण्यात गुंतलेला असतो. सल्ला देण्यासाठी आणि निवडून आलेल्या प्रतिनिधींना योग्य निर्णय घेण्यासाठी धोरणे तयार करण्यात आणि मसुदा तयार करण्यात IAS अधिकारी मदत करतो.

तर मित्रांनो  IAS information in marathi- IAS म्हणजे काय? IAS full form in marathi ह्या लेखात IASपदाविषयी संपूर्ण माहिती घेतली आहे. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर ह्यास नक्की इतरांसोबत शेअर करा. आमच्या ब्लॉगवर मूल्यहीन माहिती आम्ही शेअर करत असल्याने आमच्या ब्लॉगला सतत भेट देत रहा. धन्यवाद!

Leave a Comment