Blogging in Marathi-ब्लॉगिंग म्हणजे काय? marathi blogging करण्याचे फायदे?

ब्लॉगिंग म्हणजे काय? Blogging in Marathi

Blogging in Marathi- तुम्ही ऑनलाइन पैसे कसे कमवावे? हयाविषयी नक्कीच google वर सर्च केले असणार, त्यावेळी तुम्हाला पैसे कमवण्याचा एक मार्ग म्हणून ब्लॉगिंग हा पर्याय सुचवला गेला असेलच. त्यावेळी तुमच्या मनात ब्लॉगिंग विषयी खूप सारे प्रश्न उपस्थित झाले असतील. त्या प्रश्नांची उत्तरे आपण ह्या लेखात पाहणार आहोत. आज आपण ब्लॉगिंग म्हणजे काय आणि ब्लॉगिंग कशी करतात? marathi blogging चा फायदा! आणि ब्लॉगिंगमधून पैसे कसे कमवायचे ते जाणून घेणार आहोत. ह्याविषयी माहिती पाहणार आहोत. चला तर पाहुयात!

blogging in marathi
blogging in marathi

What is Blog in marathi? ब्लॉग म्हणजे काय?

ब्लॉग हा एक असा प्लॅटफॉर्म आहे ज्यावर आपण आपले विचार जगासमोर मांडू शकता. प्रत्येक दिवशी हजारो किंवा करोडो लोक आपल्या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी मोबाइल किंवा लॅपटॉपवरुन गूगलवर त्या प्रश्नास सर्च करतात. Google सर्च रिजल्टमध्ये जे काही दर्शविते ते सर्व रिजल्ट हे ब्लॉगला स्कॅन केल्यानंतर दाखविते. ब्लॉगला तुम्ही वेबसाइट देखील म्हणू शकता. फक्त एवढेच की ह्यात सतत आपल्याला लेख पब्लिश करावे लागतात. आणि अपडेट देखील करावे लागतात. ब्लॉगवर अनेक विषयांवर माहिती प्रकाशित केली जाते. जीला वाचून नवनवीन गोष्टी शिकल्या जातात. तसेच अनेक विषयांवर सखोल ज्ञान मिळवले जाते. ब्लॉगमधून पैसे देखील कमावले जातात. ते कशाप्रकारे हे जाणण्यासाठी कृपया लेख संपूर्ण वाचा.

ब्लॉगिंग हा सध्याचा युगात पैसे कमवण्याचा एक अद्ध्भुत मार्ग बनला आहे. तुम्ही हयातून हजारो तसेच लाखो डॉलर्सदेखील कमवू शकता. चांगल्या प्रकारे ब्लॉगिंग केल्यास ह्यात एक चांगले करियर बनु शकते. पण ब्लॉगिंग हे वाटते तितके सोपे नाही. सोपे आहेच,पण ब्लॉगिंगला  करण्याचा काही पद्धती आहे. ह्या पद्धतीविषयी जाणून घेतल्यास तुम्ही ह्यात एक चांगले करियर करू शकता.

What is blogging in marathi? ब्लॉगिंग म्हणजे काय?

तुम्ही वरील परिच्छेदात ब्लॉग म्हणजे काय हयाविषयी माहिती घेतली. ब्लॉग वर काम करतांना जी काही कामे केली जातात. त्या कामांना ब्लॉगिंग असे म्हणतात.  जसे, की लेख लिहिणे, त्यास optimize करणे, images तयार करणे, seo करणे, अशा सर्व क्रिया ब्लॉगिंग या शब्दामध्ये सामवल्या जातात.

Purpose of blogging in Marathi- ब्लॉगिंग करण्याचा उद्देश- ब्लॉगिंग का केली जाते?

Business करण्यासाठी, विशिष्ट विषयावर माहिती देण्यासाठी, लोकांशी संवाद साधण्यासाठी, आपले विचार मांडण्यासाठी, तसेच विविध कौशल्य लोकांना शिकवण्यासाठी ब्लॉगचा वापर केला जाऊ शकतो. तुमच्या ब्रँडसाठी अधिक आकर्षक वेबसाइट तयार करणे हा ब्लॉगचा उद्देश आहे. वापरकर्त्यांना तुमची सेवा देण्यासाठी आणि सेवेविषयी संपूर्ण माहिती देण्यासाठी ब्लॉगचा उपयोग केला जातो

How to Start a blog in marathi? ब्लॉग कसा सुरू करावा

Find a blog nicheब्लॉगचा टॉपिक/विषय शोधा

ब्लॉग सुरू करणे ही खरोखर मजेदार प्रक्रिया आहे. डोमेन खरेदी करणे, वेबसाइट कॉस्टमाइज करणे, डिझाइन तयार करणे आणि तुमचा पहिला लेख लिहिणे हा नक्कीच एक रोमांचक प्रवासाचा अनुभव आहे. परंतु, बहुतेक लोक काही महिन्यांनंतर ब्लॉगिंग करणे सोडून देतात कारण त्यांना त्यात रस कमी झालेला होतो. त्यांना ते कंटाळवाणे वाटते. त्यामुळे, तुम्ही तुमच्या ब्लॉगसाठी एखादा विषय निवडणे महत्त्वाचे आहे ज्याबद्दल तुम्हाला शिकायला आणि बोलायलाही आवडत असेल.

तुम्ही ब्लॉगिंगसाठी कोणत्याही विषयावर तज्ञ(expert) असणे महत्वाचे नाही. आपण ब्लॉगसाठी एक मनोरंजक विषय कसा निवडाल? आवडता विषय निवडण्यासाठी एक पेन आणि कागद घ्या. मनातील आवडीचे 10 विषय त्या कागदावर लिहा. यामुळे तुम्ही ब्लॉगिंगसाठी एक आवडीचा विषय निवडू शकाल.

तुम्ही एखादा विषय निवडण्यासाठी keyword research देखील करू शकता. तुमच्या मनात जे काही विषय असतील त्यांचा स्कोप keyword research द्वारे तपासून पहा. ह्या प्रक्रियेला काही वेळ लागू शकतो. पण तुम्ही जर एखादा कमी competition असलेला ब्लॉग टॉपिक शोधून घेतला तर तुम्ही त्यात लवकर यशस्वी होऊ शकता. आणि चांगले पैसे कमवू शकता.

                             टीप- marathi blogging करणे खूप फायद्याचे ठरू शकते. कारण, यात खूप कमी competition असेन चांगले पैसे कामावण्याची संधि आहे.

Select a domain- Domain ची निवड कशी करावी?

तुम्ही अनेक वेबसाइट्सना भेट दिली असेलच. तुम्ही पाहिलेच असेल की, सर्वात लोकप्रिय डोमेन हे .com आहे. तर इतर विश्वसनीय आणि लोकप्रिय domain हे .org आणि .net आणि भारतात .in हे आहे. या व्यतिरिक्त .xyz, .tk असे अनेक प्रकारचे domainआहेत. परंतु ते जास्त लोकप्रिय आणि विश्वासनिय नसल्याने त्यांना देखील तुम्ही कधीच buy करू नका. .com डोमेन उपलब्ध असल्यास, तुमच्या वेबसाइट/ब्लॉगसाठी त्यालाच खरेदी करा.

तुमचे डोमेन नाव मोठे असल्यास, लोकांसाठी ते लक्षात ठेवणे कठिण होईल, त्यामुळे असे domain निवडा ज्यात कमी अक्षर असतील आणि लक्षात ठेवण्यायोग्य असेल. जसे- google…..

तसेच, शब्दलेखन किंवा उच्चार करणे कठीण असल्यास लहान डोमेन नाव उपयुक्त ठरत नाही, कारण तुमची वेबसाइट URL टाइप करण्याचा प्रयत्न करताना वापरकर्ते इतर वेबसाइट वर देखील पोहचू शकता.

डोमेन खरेदी करण्याची प्रक्रिया-

  1. सर्वप्रथम godaddy च्या website वर जा.
  2. त्यानंतर सर्च बॉक्स मध्ये पाहिजे असलेले डोमेन टाइप करून सर्च करा.    
  3.  ते डोमेन तुमच्यासाठी उपलब्ध असल्यास Add to Cart ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही त्यास खरेदी करू शकता.
Blogging in Marathi

Blogging Platform- ब्लॉगिंग करण्यासाठी कोणते प्लॅटफॉर्म निवडावे? #bloggerVSwordpress

 

एक उत्तम ब्लॉग तयार करण्यासाठी योग्य ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म निवडणे देखील महत्वाचे आहे.

आम्ही खाली सर्वोत्तम प्लॅटफॉर्म दिलेले आहेत. ज्यांचा मदतीने तुम्ही काही क्लिक करून ब्लॉग सेट-अप करू शकता.

 

WordPress-

वर्डप्रेस हे सर्वात लोकप्रिय ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही जर नवीन ब्लॉगर असाल तर तुम्हाला येथूनच ब्लॉगिंगची सुरुवात करायला हवी. हे विनामूल्य आहे. परंतु ह्यावर तुम्हाला होस्टिंग घेण्यासाठी खर्च लागतो. ती तुम्ही hosting द्वारे घेऊ शकता. तुम्ही व्यावसायिक ब्लॉग तयार करू इच्छित असाल तर तुम्ही wordpress चा नक्कीच उपयोग करा. ह्यात plugins हे खूप उपयुक्त असल्याने तुम्हाला seo(search engine optimization) करण्यात देखील मदत होते.

Blogger-

WordPress प्रमाणेच blogger हे देखील सर्वाधिक लोकप्रिय ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे. ह्याचे प्रमुख कारण म्हणजे हे google च्या मालकीचे आहे. नवीन ब्लोग्गर्स हे देखील ह्या प्लॅटफॉर्म चा वापर करून blogging ची सुरुवात करू शकता. ह्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हे विनामूल्य असून,ह्यावर होस्टिंग मोफत आहे. तुम्हाला फक्त डोमेन-नेम साठी खर्च लागतो. वापरण्यासाठी खूप सोपे असे हे प्लॅटफॉर्म आहे.

नवीन ब्लॉगर्स  blogger आणि wordpressयांपैकी कोणतेही प्लॅटफॉर्म वापरुन ब्लॉगिंग करू शकता. याव्यतिरिक्त wix, medium, यांसारखे ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहेत. परंतु नवीन ब्लॉगरसाठी blogger आणि wordpress हेच platform आम्ही suggestकरतो.

Important pages to create on Blog- ब्लॉगवरील महत्वाचे पेज

जर तुमच्या ब्लॉग तयार झाला असेल आणि तुम्ही आता पोस्ट लिहिणे सुरू केले असेल तर आणखी एक काम पूर्ण करा ते म्हणजे ब्लॉगवर page तयार करणे. हे केल्याने ब्लॉगवर येणारे users चा विश्वास आपल्या ब्लॉगवर असतो. तुमच्या ब्लॉगवरील restrictions, नियम व अटी, संपर्क पत्ता, आणि आपल्याविषयी माहिती. अशा प्रकारेची माहिती आपण pages द्वारे यूजर्सला देऊ शकतो.

तुम्ही खालील pages नक्की तयार करा.

pivacy policy, about us, contact us, terms & conditions, disclaimer. Etc

तर मित्रांनो, आजच्या लेखात आपण Blogging in Marathi-ब्लॉगिंग म्हणजे काय? marathi blogging करण्याचे फायदे? ह्या लेखात आपण ब्लॉगिंगविषयी संपूर्ण माहिती पाहिली आहे. तुम्ही ब्लॉगिंग मधून कसे पैसे कमवू शकता? ब्लॉगिंगचे फायदे, ब्लॉगिंगची सुरुवात ह्याविषयी संपूर्ण माहिती आपण घेतली आहे. जर हा लेख तुम्हाला आवडल्या असेल तर ह्यास नक्की शेअर करा. तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेन्टद्वारे नक्की विचारा. आणि आमच्या ब्लॉगला सतत भेट देत रहा. धन्यवाद!

Leave a Comment