BHIM upi काय आहे? BHIM upi full form in Marathi- BHIM UPI in Marathi

BHIM UPI in Marathi

Bhim upi in Marathi:- मित्रांनो, ह्या लेखात आपण BHIM UPI app काय आहे? आणि ह्याचा उपयोग कसा करता हयाविषयी माहिती पाहणार आहोत. खरं-तर ह्या अप्पचा उपयोग जवळ जवळ सर्वच जण करतात. हे app पैशांचा देवाणघेवाणी साठी खूप फायदेशिर आहे. तर ह्या महत्वाच्या app विषयी आपण ह्या लेखात पाहणार आहोत. त्यासोबतच ह्याचा उपयोग आणि ह्याच्याविषयी काही महत्वाची माहिती आपण पाहणार आहोत. चला तर पाहुयात!

BHIM UPI काय आहे? What is BHIM upi in Marathi?

BHIM UPI हे एक भारतीय मोबाइल पेमेंट अॅप आहे, जे युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) शी संबंधित असलेल्या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (npci) ने डेवलप(तयार) आणि लॉन्च केले आहे. ह्या appचे नाव डॉ.बी.आर आंबेडकर ह्यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. BHIM UPI ला दिनांक 30 डिसेंबर 2016 रोजी लॉन्च करण्यात आले. ह्याचा मुख्य उद्देश थेट बँकांद्वारे ई-पेमेंट ची सुविधा करणे आणि कॅशलेस व्यवहारांना आधार आणि प्रोत्साहन देणे हा आहे.

08 नोव्हेंबर 2015 रोजी जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक नोटाबंदीची घोषणा केली, तेव्हा सर्वसामान्यांना पैशाची समस्या होती, त्यानंतर 30 डिसेंबर 2016 रोजी हे अॅप लॉन्च करण्यात आले. BHIM UPI अॅप्लिकेशन UPI ​​वापरणाऱ्या सर्व भारतीय बँकांशी लिंक आहे. आणि (IMPS-Immediate Payment Service) ह्या डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे app जवळजवळ सर्व मोबाइल डिव्हाइसवर वापरले जाऊ शकते

आता आपण BHIM upi काय आहे ते वरील परिच्छेदात पाहिले आहे. ह्या UPI तंत्रज्ञानाचा वापर होतो. पुढे UPI विषयी थोडक्यात माहिती देण्यात आली आहे.

Read Also : Programming म्हणजे काय?

What is UPI in Marathi? UPI म्हणजे काय?

युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ही नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) आणि भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) यांनी विकसित केलेली कॅशलेस इन्स्टंट पेमेंट सुविधा आहे. NPCI ही संस्था आज देखील कार्यरत असून, भारतातील सर्व बँकेचे ATM कार्ड आणि त्याद्वारे होणारे व्यवहार पाहण्याचे काम करते. UPI हे IMPS तंत्रज्ञानावर आधारित आहे.  या सुविधेचा वापर करून, कोणत्याही दोन व्यक्तींच्या बँक खात्यात त्वरित पैसे स्थ्लांतरीत केले जाऊ शकतात. तुम्ही काही सेकंदात फक्त 1 रुपये ते 10,000 रुपये पैसे पाठवू शकता. UPI द्वारे 24*7 वेळ पैशांचे व्यवहार केले जाऊ शकतात. आणि UPI व्यवहार करतांना कोणतेही अतिरिक्त शुल्क लागत नाही.

UPI चे full form युनिफाइड पेमेंट इंटरफेस‘(unified payment interface) हे आहे. ह्यासNPCI आणि RBI यांनी 11 एप्रिल 2015 रोजी लॉंच केले होते. ऑनलाइन पेमेंट करण्याचा हा एक नवीन मार्ग आहे, जो 2021 पर्यन्त भारतातील एकूण पेमेंट व्यवहारांच्या 30% पर्यंत पोहोचला आहे.

ज्याप्रकारे आपण पैसे ट्रान्सफरत करण्यासाठी आपला बँक खाते क्रमांक वापरतो, त्याचप्रमाणे UPI आयडी हा UPI सुविधेतील व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी आणि त्याच्या/तिच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरला जाणारा क्रमांक आहे. ह्यास आपण ID proof देखील म्हणू शकतो.

BHIM UPI UPI अॅप वापरण्यापूर्वी, तुम्हाला UPI आयडी तयार करणे आवश्यक आहे.आणि UPI ID तयार करण्यासाठी तुमच्याकडे ATM कार्ड असणे देखील आवश्यक आहे. जर तुम्ही हे अॅप वापरत असाल तर तुमचा UPI आयडी तयार झाला आहे पण तुम्हाला UPI ID मिळाला नसेल तर एकदा BHIM UPI मधील प्रोफाइल तपासून पहा.

BHIM चा फूल फॉर्म काय आहे? BHIM full form in Marathi!

BHIM चा फूल फॉर्म Bharat Interface for Money असा आहे।

BHIM UPI चे फायदे? Benefits of BHIM upi in Marathi

 BHIM अॅपवरून व्यवहार केल्यास कॅशबॅक मिळवता येतो.
कॅशबॅक मिळवून तुम्ही तुमच्या BHIM upi ने एका महिन्यात अनेक व्यवहार करून खूप पैसे वाचवू शकता. जर तुम्ही जवळ-जवळ 100 रु. चा व्यवहार करतात. तर, तुम्हाला काहीवेळेस रु.25 कॅशबॅक देखील मिळतात.
 तुम्ही या अॅपवरून पैशांच्या व्यवहारांसह बिले देखील भरू शकता आणि त्यांच्याद्वारे देखील कॅशबॅक मिळवू शकता.

  1.  हयाच्यावरील व्यवहार सोपे, जलद आणि सुरक्षित आहेत.
  2. ह्यात कोणतेही अतिरिक्त शुल्क लागत नाही.
  3. अॅप विनामूल्य डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.
  4.  एखाद्याकडे UPI नसले तरीही त्याच्या बँक खात्यावर पेमेंट केले जाऊ शकते.
  5. अॅप 24*7 काम करते. ह्यात पेमेंट लिमिट ही वॉलेट पेक्षा जास्त आहे.
  6. हे app इंग्रजी, बांगला, हिंदी आणि गुजरातीसह भारतातील आणि इतर १३ भाषांमध्ये उपलब्ध आहे. हे वापरण्यास आणि सेटअप करण्यास अतिशय सोपे आहे.
  7.  हे app इंग्रजी, बांगला, हिंदी आणि गुजरातीसह भारतातील आणि इतर १३ भाषांमध्ये उपलब्ध आहे. हे वापरण्यास आणि सेटअप करण्यास अतिशय सोपे आहे.

How to use BHIM UPI in Marathi? BHIM UPI चा वापर कसा करावा?

BHIM UPI अॅप कसे वापरावे याबद्दल येथे खाली मार्गदर्शन केले आहे: त्याचे क्रिया करा आणि अॅप कसे वापरावे ते शिका.

1. जर तुम्ही Android वापरकर्ते असाल तर play store वर “BHIM” असे सर्च करून तुम्ही ह्यास डाऊनलोड करू शकता. आणि तुम्ही IOS वापरत असाल तर तुम्ही त्यात BHIM ला इंस्टॉल करू शकत नाही.

2. ऍप्लिकेशन इंस्टॉल झाल्यानंतर BHIM app ओपेन करा. पुढे तुमची भाषा निवडण्यास सांगितली जाईल. भाषा निवडून झाल्यानंतर, एसएमएस पर्याय वापरून तुमचा फोन नंबर verify करावा लागेल. इथे फक्त तोच मोबाईल नंबर द्या जो तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे. पुढे Next  वर क्लिक करा आणि Verify प्रक्रिया पूर्ण होण्याची वाट पहा.

3. मोबाइल नंबर verify करण्यासाठी SMS द्वारे येणारा 4 अंकी OTP टाइप करून Next बटन दाबा.

4. पहिल्यांदा BHIM UPI ओपेन करत असल्यास पासकोड सेट-करा. पासकोड सेट केल्यानंतर, अॅपवर तुम्हाला तुमची बँक निवडण्यास सांगितले. एकदा बँक निवडल्यानंतर, अॅप तुमचा फोन नंबर वापरून बँकेकडून तुमची माहिती आपोआप प्राप्त करेल. एकापेक्षा जास्त बँक खाती असल्यास, तुमच्या सर्व व्यवहारांसाठी वापरले जाणारे प्राथमिक बँक खाते निवडा.

5. वरील सर्व क्रिया केल्यानंतर BHIM appचे मुख्यपान दिसते. ह्यात SEND, REQUEST आणि SCAN असे पर्याय दिलेले असतात. हयापैकी SCAN आणि PAY हे पर्याय UPI ID वापरत असलेल्या व्यक्तीस पैसे पाठवण्यासाठीच वापरता येता.

6. एखाद्याला पैसे पाठवण्यासाठी, त्यांचा फोन नंबर आणि ट्रान्सफर करायची रक्कम टाइप करा. अॅप तुम्हाला तुमचा MPIN इनपुट करण्यास सांगेल, MPIN हा चार किंवा सहा अंकी असू शकता. ह्यास तुमच्या मनानुसार तुम्ही सेट करू शकता.

7. त्याचप्रमाणे, रिक्वेस्ट मनी ऑप्शनसह, तुम्ही एखाद्याचा फोन नंबर वापरून पैशाची मागणी करू शकता.

8. तिसरा पर्याय स्कॅन आणि पे हा आहे. वापरकर्त्यांना बारकोड (QR कोड) वापरून पैसे पाठवण्याची सुविधा करून देते. प्रत्येक फोन नंबरला एक QR कोड दिला जातो. प्रोफाइल सेक्शन मध्ये आपण त्यास पाहू शकतो.

FAQ- BHIM UPI in Marathi

 

BHIM UPI हे काय आहे?

BHIM upi हेएक पेमेंट अॅप्लिकेशन आहे. जे यूजर्सला पैशांच्या ऑनलाइन व्यवहार करण्याची सुविधा देते. जे तुमचा मोबाइल नंबर वापरुन सुद्धा पेमेंट करण्याची सुविधा करून देते.

BHIM UPI सर्व हँडसेट आणि ऑपरेटिंग सिस्टमसाठी उपलब्ध आहे का?

BHIM सध्या iOS (व्हर्जन 9.0 व 9+) आणि Android OS (5.0 आणि 5+) असलेल्या सर्व हँडसेटसाठी उपलब्ध आहे.

UPI म्हणजे काय?

सोप्या भाषेत, UPI हे 2 वापरकर्त्यांमधील पैसे ट्रान्सफर करण्याचा एक मार्ग आहे. हे एक प्रकारे NEFT किंवा RTGS सारखेच आहे.

UPI मनी ट्रान्सफरची मर्यादा किती आहे?

एका वेळी किमान रु. 1 आणि कमाल रु. 10,000 आणि दैनंदिन मर्यादा रु. 1 लाख. पर्यंत पैशांचा व्यवहार UPI द्वारे करता येतो.

भारताबाहेर भीम यूपीआय चा वापरू केला जातो का?

हो, तुम्ही BHIM UPI अॅपच्या मदतीने भारताबाहेर पैशांचे व्यवहार करू शकता. परंतु, भारताबाहेरील बँक आपण BHIM UPI मध्ये जॉइन करू शकत नाही.

BHIM UPI वापरण्याचे शुल्क काय आहे?

BHIM UPI वर व्यवहार करण्यासाठी NPCI कोणत्याही वापरकर्त्याकडून शुल्क आकारत नाही. परंतु तुमची बँक शुल्क आकारू शकते. त्यांचे शुल्क विचारण्यासाठी कृपया तुमच्या बँकेशी संपर्क साधा.

BHIM UPI इंटरनेटशिवाय काम करते का?

तुम्ही इंटरनेटशिवाय BHIM UPI अॅप चालवू शकत नाही, परंतु कोणत्याही मोबाइल फोनवर इंटरनेटशिवाय BHIM UPI च्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी *99# डायल करून BHIM UPI अॅप सारखी काही कामे करू शकता.

तर मित्रांनो, BHIM upi काय आहे? BHIM upi full form in full form- BHIM UPI in Marathi ह्या लेखात आपण BHIM UPI विषयी संपूर्ण माहिती घेतली आहे. तुम्हाला हा लेख आवळल्यास ह्यास नक्की शेअर करा. तुमचे काही प्रश्न असल्यास आम्हाला कॉमेंट द्वारे नक्की विचारा. आणि आमच्या ब्लॉगला सतत भेट देत रहा. धन्यवाद!

Leave a Comment